दिपक देशमुख
नवी मुंबईकरांनी आळविला नाराजीचा सूर, खासगी रूग्णालयाची गरजच काय – राष्ट्रवादीचा सवाल
नवी मुंबई : महानगरपालिकेची दोन कोव्हिडं रुग्णालये असतानाही आयसीसीयु बेड व व्हेंटिलेटर कमी पडतात.म्हणून मनपाने दोन दिवसापुर्वी नेरुळ येथील डीवाय पाटील रुग्णालयाशी रुग्णांना सेवा मिळावी म्हणून महिन्याला कोट्यावधी रुपयांचा करार केल्याने नवी मुंबईकर आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत. जर महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून रुग्णालये बांधली आहेत. तर आता खासगी रुग्णालयाची गरजच काय आहे?असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश संघटक सचिव सलीम बेग यांनी मनपाला विचारला आहे.
नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव सुरू झाल्या नंतर मनपाने वाशी सार्वजनिक रुग्णालयाचे रुपडे बदलून खास कोव्हिडं रुग्णालयात रूपांतर केले. याठिकाणी आधीपासूनच आयसीसीयु बेडस व व्हेंटिलेटर उपलब्ध होते. तसेच नव्याने सुद्धा यंत्रसामुग्री आणली गेली. त्याचबरोबर वाशी येथेच सिडको प्रदर्शन गृहात ११३२ बेडसचे रुग्णालय नव्याने युद्धापातळीवर कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आले. या रुग्णालयाचा उदघाटनदेखील आरोग्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांच्या हस्ते झाले. असे असताना आता खासगी रुग्णालयाशी करार करण्यामागे नक्की मनपाची काय गेम आहे असाही सलीम बेग यांनी उपस्थित केला आहे.
- मनपा व डीवाय पाटील मध्ये काय आहे करार?
मनपा व डीवाय पाटील रुग्णालय यांच्यात ४ ऑगस्ट रोजी एक करार झाला. त्या करारात २०० आयसीसीयु बेड व ८० व्हेंटिलेटर मनपाकडून आलेल्या रुग्णांना विनामूल्य देण्याचे ठरले आहे. १० ऑगस्टपर्यंत ५० व पुढील दहा दिवसांच्या तीन टप्प्यात म्हणजे १० सप्टेंबरपर्यँत २०० बेडस व ८० व्हेंटिलेटर देण्यात येतील.बेडस व व्हेंटिलेटर ठरल्याप्रमाणे प्राप्त झाल्या नंतर मनपाकडून दर महिन्याला २ कोटी ८६ लाख म्हणजे जवळ जवळ तीन कोटी रुपये डीवाय पाटील रुग्णालयाला अदा करायचे आहेत.
मनपाचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सिडको प्रदर्शन गृहात असलेल्या कोव्हिडं रुग्णालयाची पाहणी केली. त्यांनी पाहणी केल्या नंतर स्वतः आयुक्तांनी आयसीसीयु बेड व व्हेंटिलेटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. यांचा अर्थ ९ जूनला कोव्हिडं रुग्णालयाचा झालेला उदघाटन हे थोतांड होता. म्हणजे आजही कोव्हिडं रुग्णालय अपूर्ण असून मनपाचे अपयश लपविण्यासाठीच नेरुळ येथील खासगी रुग्णालय बरोबर करार करून कोट्यावधी रुपयांचा चुना मनपाला लावला जात आहे. हे चुकीचे असून मनपा लवकरच दिवाळखोरीत आल्याशिवाय राहणार नसल्याचेही सलीम बेग यांनी सांगितले.
******************************
वाशी प्रदर्शन सभागृहत कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रुग्णालायत कोणत्याही अत्याधुनिक सुविधा नाहीत.त्यामुळे याचा वापर फक्त अलगिकरण कक्षच म्हणून केला जात आहे.याठिकाणी फक्त थोडीफार लक्षणे असणारे व नसणारे कोरोना रुग्ण असणारेच ठेवले जात आहेत. यावरून हे कोव्हिडं रुग्णालय फक्त अलगिकरंण कक्षच म्हणून प्रसिद्ध पावला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
********
गंभीर व अतिगंभीर रुग्णांना आयत्यावेळेला आयसीसीयु बेड व व्हेंटिलेटर मिळतेच असे नाही.अश्या वेळेला रुग्णाला अडचणी येऊ नयेत म्हणून खासगी रुग्णालयाशी करार करण्यात आला आहे.
संजय काकडे,अतिरिक्त आयुक्त,मनपा