
नवी मुंबई : पुणे येथील पत्रकार पांडुरंग गायकर यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले.नवी मुंबई शहरातील पत्रकारांच्या वतीने मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षात गायकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पत्रकारांच्या आरोग्य समस्या आणि उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी पत्रकारांच्या शिष्टमंडळ वतीने मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि सह आयुक्त सुजाता ढोले पाटील यांची भेट घेतली.या प्रसंगी डी वाय पाटील रुग्णालयात पत्रकारांना उपचार सुविधा मिळण्यासाठी ४० राखीव बेडस ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले असून याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे जाहीर करण्यात आले.
पत्रकारांच्या विविध समस्या आणि अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.पत्रकारांच्या कुटुंबियांना सुविधा मिळाव्यात म्हणून निवेदन देण्यात आले. याला आयुक्त अभिजित बांगर यांनी तात्काळ संमती दिल्याने आता नवी मुंबई शहरातील पत्रकारांना तातडीने आरोग्य उपचार सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी अभिजित बांगर यांनी बातम्या करताना सुरक्षेसाठी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. पत्रकारांना कोणतीही अडचण असेल तर तातडीने मनपा आरोग्य विभाग कृती करणार असल्याने पत्रकारांना दिलासा मिळाला आहे. पत्रकार कक्षात श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी मनसेचे ऐरोली शहर अध्यक्ष निलेश बानखिले बाळासाहेब शिंदे यांनी सॅनिटायझर स्टॅण्ड प्रेस रुमसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले. मनपा जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी समनव्यय साधण्याबाबत सहकार्य करण्यासाठी तयारी दर्शविली. या वेळी नवी मुंबई शहरातील विविध वृत्तपत्र वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.