• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 21, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 3, 2020

वांद्रे येथील शासकीय वसाहतीचे रूपडे लवकरच बदलणार : अशोक चव्हाण

adminbyadmin
in Uncategorized
0
वांद्रे येथील शासकीय वसाहतीचे रूपडे लवकरच बदलणार : अशोक चव्हाण

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

मुंबई :  पूनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचे रूपडे बदलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा प्रारंभिक भाग म्हणून सद्यस्थितीत या वसाहतीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी आज दिले.

वांद्रे शासकीय वसाहतीच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने गुरूवारी दुपारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी ही माहिती दिली. या बैठकीला आ. झिशान सिद्दिकी, आ. शिरीष चौधरी, माजी आमदार बाबा सिद्दिकी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (इमारत) अजित सगणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि वसाहतीतील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत आ. सिद्दीकी, आ. चौधरी आणि रहिवाशांच्या प्रतिनिधींनी तेथील समस्यांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही एक सादरीकरण करून तेथील परिस्थिती मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना चव्हाण यांनी राज्य सरकार वांद्रे वसाहतीतील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.

या वसाहतीत नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, तोवर या इमारतीत सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. दुरूस्ती-देखभालीच्या या कामासाठी लागणारा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेबाबत पाच आमदारांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ठेवण्यात येईल, असेही अशोक चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले. 

Previous Post

नेरूळच्या डी वाय पाटील रुग्णालयात पत्रकारांना राखीव बेडस

Next Post

मासे विक्री करणाऱ्या स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांना परवाने द्या : मनोज मेहेर

Next Post
मासे विक्री करणाऱ्या स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांना परवाने द्या : मनोज मेहेर

मासे विक्री करणाऱ्या स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांना परवाने द्या : मनोज मेहेर

मुलाखतीला नाही, कार्यरत नाही तरीही नवी मुंबई युवक कॉंग्रेसचे मिळाले अध्यक्षपद

मुलाखतीला नाही, कार्यरत नाही तरीही नवी मुंबई युवक कॉंग्रेसचे मिळाले अध्यक्षपद

अन्यथा खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून सत्कार करू

अन्यथा खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून सत्कार करू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com