
स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३
नवी मुंबई : दसऱ्यानिमित्त एकमेकांचे संबंध वृध्दींगत करण्यासाठी आपट्यांची पाने सोने म्हणून वाटण्याची व त्यानिमित्ताने वडीलधाऱ्या ज्येष्ठांचे आशिर्वाद घेण्याची पूर्वापार प्रथा आहे. दसऱ्यानिमित्त रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी जुईनगर, सेक्टर २४ येथील सप्तश्रृंगी सोसायटीमधील रहीवाशांना घरोघरी जावून सोन्यासोबत एन-९५चे मास्कचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना काळ आहे. त्यामुळे येथील रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क वाटण्याचा निर्णय घेतला आहे. सोसायटीचे माजी अध्यक्ष व सदस्य विजय कुरकुटे, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्यावतीने हे मास्क वाटप सांयकाळी ७ वाजता करण्यात आले.
सोसायटीत मास्क वाटप करताना सोसायटीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हा सचिव विजय कुरकुटे, श्रीमती विद्या अरुण भांडेकर, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, सोसायटीचे सर्व पदाधिकरी उपस्थित होते. श्री तळेकर गुरुजी, संतोष पोळ, श्री. गोधडी, भोसले, पाटील, देसाई, कुंभार, किटे, इंगळे, पिसाळ, महाजन, धुरी, निकम, दाते, शेवंता मोरे यांच्यासह इतरही ज्येष्ठ नागरिक सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.