
नवी मुंबई : सानपाडा येथे साईभक्त महिला बचत गटाच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा दि. २४ ऑक्टोबर रोजी पार पडला. साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष व सानपाड्यातील भाजपाचे पांडुरंग आमले आणि समाजसेविका शारदा पांडुरंग आमले यांच्या प्रयत्नांतून हे कार्यालय उभारले गेले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी समाजसेवक पांडुरंग आमले व समाजसेविका शारदा आमले हे महिलांसाठी व सानपाड्यातील नागरिकांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. महिलांना रोजगार मिळणार असून उद्योग क्षेत्रात आपले पाऊल टाकता येणार आहे. यावेळी भाजपा सानपाडा प्रभाग क्र. ७६ व साई भक्त महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात पारितोषिक मिळवलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात १२ पैठणी व १ सोन्याची नथ व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी भाजपाचे प्रदेश आयटी सेल संयोजक सतीश निकम, जिल्हा उपाध्यक्षा नीता आंग्रे, युवा मोर्चा सचिव दीपिका बामणे, जिल्हा सचिव भारती मोरे, देवनाथ म्हात्रे, सानपाडा जुईनगर मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप, तालुका सचिव रमेश शेट्ये, पंकज दळवी, सुलोचना निंबाळकर, मंगल वाव्हळ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.