
नवी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करा : अशोक गावडे नवी मुंबई : पावसाळा गेला असल्याने डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळा पूर्णपणे संपला आहे. परतीच्या पावसाचाही कारभार आता पूर्णपणे आटोपला आहे. नवी मुंबई शहरामध्ये डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा नवी मुंबईकरांना सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दिघा ते बेलापुर या दरम्यान असलेल्या नवी मुंबई कार्यक्षेत्रातील गावठाण तसेच कॉलनी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात पालिका प्रशासनाने लवकरात लवकर धुरफवारणी सुरू करण्याची मागणी अशोक गावडे यांनी केली आहे.