
श्रीकांत पिंगळे – संपादक – संपर्क 9820096573
नवी मुंबई : 21 व्या शतकातील शहर म्हणून मागील कित्येक वर्षात बोलबाला असणाऱ्या नवी मुंबई शहरात प्रदुषणामुळे नवी मुंबईकर प्रचंड त्रासले आहेत. ‘केोरोना’ महामारीच्या काळात नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याचा धोका असून जर ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ’ने होत असलेले हे प्रदुषण थांबविले नाही तर मंडळावर मोर्चा आणून जाब विचारु, असा इशारा नवी मुंबईचे शिल्पकार, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईकरांचा श्वास एमआयडीसी भागातून होणाऱ्या प्रदुषणामुळे कोंडतो आहे. घणसोली, केोपरखैरणे, बोनकेोडे, खैरणे, केोपरी, पावणे, तुर्भे, वाशी, सानपाडा या भागात प्रकर्षाने आणि सभोवतालच्या इतर सर्व भागात सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात दुर्गंधीयुवत धूर पसरलेला असतो. प्रक्रिया न करता काही कंपन्या रासायनिक पाणी खाडीत सोडत असतात. ध्वनी प्रदुषणही वाढले आहे. आमदार गणेश नाईक यांनी सदर प्रदुषणाविषयी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागील तीन आठवडे सतत पाठपुरावा करीत होते.
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ’ला पत्रही दिले. मात्र, मंडळाकडून कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे आमदार गणेश नाईक यांनी 2 नोव्हेंबर रोजी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ’च्या महापे कार्यालयावर धडक दिली. कोरोना श्वसनासंबंधी विकार आहे. फुफ्फुसावर विपरीत परिणाम करतो. प्रदुषित वातावरणात या आजाराने बाधित नागरिकांची प्रकृती आणखी खालावू शकते असे सांगून आ. गणेश नाईक यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ’ला वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची माहिती संकलित करण्यास सांगितले. गरज असेल तर या कामासाठी जादा अधिकारी नेमा असेही सुचवले.
प्रदुषणकारी कंपन्यांची माहिती प्राप्त झाल्यावर त्याना नोटीसा द्या; त्या नंतरही त्यांनी प्रदुषण करणे सुरुच ठेवले तर मात्र सरळ केोणतीही हयगय न करता या कंपन्या जनतेच्या व्यापक आरोग्य हितासाठी बंदच करा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली.
त्यावर प्रदुषणवारी कंपन्या शोधून काढण्यासाठी अतिरिक्त अधिकारी नेमून या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ’चे वरिष्ठ अधिकारी पाटील यांनी मान्य केले. तर पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ’च्या कार्यालयात येवू, तेव्हा प्रदुषण नियंत्रणात आणण्याची कार्यवाही झालेली असली पाहिजे; अन्यथा पुढच्या भेटीत या प्रश्नी धडक मोर्चा आणण्याची वेळ आणू देवू नका, असा सज्जड इशाराच आमदार गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी आमदार गणेश नाईकांसमवेत नवी मुंबईचे विकासपर्व व उभा महाराष्ट्र ज्यांना त्यागमूर्ती नावाने ओळखतो ते ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, ‘भाजपा’चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक व पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, शुभांगी पाटील, शशिकांत राऊत, चंद्रकांंत पाटील, पुरुषोत्तम भोईर, उषा भोईर, मुनावर पटेल, कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईच्या राजकारणात ओळखले जाणारे सुरज पाटील, अमित मेढकर, शशिकांंत भोईर आदि उपस्थित होते.