• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 4, 2020

कल्याणमध्ये मिळत होते मृत्यूचे बनावट दाखले, डॉक्टरांचे त्रिकूट जेरबंद

adminbyadmin
in Uncategorized
0
कल्याणमध्ये मिळत होते मृत्यूचे बनावट दाखले, डॉक्टरांचे त्रिकूट जेरबंद

ठाणे – कल्याण पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास, त्या रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूचा बनावट दाखला देत असल्याचा धक्कादायक प्रकार मागील महिन्यात समोर आला होता. खळबळजनक बाब म्हणजे मृत्यू दाखल्यावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सही व शिक्का बनावट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अरुण चंदेल यांनी साई स्वस्तिक रुग्णालयच्या चार डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांचा पुढील तपास सुरू होता. आता महिन्याभरानंतर फरार असलेल्या डॉक्टरांच्या त्रिकूटाला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉ. स्वप्नील मुळे, डॉ. तुषार ढेंगे, डॉ. सतीश गीते अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

असा झाला पर्दाफाश
कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात साई स्वस्तिक हे खासगी रुग्णालय आहे. कोरोनाच्या काळात या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावेळी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या डेथ सर्टिफिकेटवर असलेली सही, शिक्का दुसऱ्याच डॉक्टरचा म्हणजेच उल्हासनगर येथील शासकीय सेंट्रल हॉस्पिटलमधील चीफ मेडिकल ऑफिसर अरुण चंदेल यांचा असल्याचे मृताच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. सुदैवाने संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक या डॉक्टरच्या ओळखीचे निघाल्याने त्यांनी डॉ. चंदेल यांना डेथ सर्टिफिकेट दाखवले असता आपल्या नावाचा गैरवापर केला जात असून डॉ. चंदेल यांचा या साई स्वस्तिक रुग्णालयाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डॉ. चंदेल यांनी ३ ऑक्टोबर रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विना परवानगी सही शिक्क्याचा वापर करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चार डॉक्टरांविरोधात भादंवी. कलम ४६८, ४७१, ४६२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

महापालिकेने केला रुग्णालयाचा परवाना रद्द
विशेष म्हणजे नगरसेवक महेश गायकवाड यांनीही याच साई स्वस्तिक रुग्णालयातील गैरकारभार दोन महिन्यापूर्वी समोर आणला होता. या रुग्णालयात त्यावेळी ११ दिवस एक महिला कोरोना या आजारावर उपचार घेत होती. त्याचे जवळपास ४ लाखाच्या घरात बिल झाले, परंतु तिची तब्येत खालावल्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने हलवण्यास सांगितले. शिफ्ट करण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तसेच अजूनही ३ ते ४ रुग्ण या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत पावल्याचे महेश गायकवाड यांनी त्यावेळी सांगितले होते. यानंतरही दोन रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारले गेल्याची तक्रार कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे मनपाने रुग्णालयास नोटीस पाठवून विचारणा केली होती. मात्र, रुग्णालयाने त्याचे उत्तर न दिल्याने रुग्णालयाचा परवाना मनपाने ३१ ऑगस्टपर्यंत रद्द केला होता.

आरोपीना चार दिवसाची पोलीस कोठडी
या गुन्ह्याचा अधिक तपास करणारे सपोनि के. एन. वाघ यांनी १ महिन्यानंतर ३ आरोपी डॉक्टरांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अशा प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक करून डॉ. चंदेल यांच्या शिक्याचा वापर या आरोपींनी मृत्यू दाखले दिले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Previous Post

अपंगांना महापालिका प्रशासनाकडून दिली जाणारी पेन्शन वेळेवर द्या : सौ. सुनिता रतन मांडवे

Next Post

घणसोली सेक्टर ९ मधील रुग्णालयाच्या भूखंडावर रुग्णालयच उभारण्याची मनसेची मागणी

Next Post
घणसोली सेक्टर ९ मधील  रुग्णालयाच्या भूखंडावर रुग्णालयच उभारण्याची मनसेची मागणी

घणसोली सेक्टर ९ मधील रुग्णालयाच्या भूखंडावर रुग्णालयच उभारण्याची मनसेची मागणी

प्रभाग ७६ मध्ये पावसाळीपूर्व कामांना सुरूवात करा : पाडूंरंग आमले

प्रभाग ७६ मधील क्रिडांगणाची सफाई करा : पांडुरंग आमले

जनतेला  गरज नसतानाही पर्यावरणाची हानी करून गटाराचे व जॉगिंग ट्रॅकचे काम कोणासाठी? : मनोज मेहेर

जनतेला गरज नसतानाही पर्यावरणाची हानी करून गटाराचे व जॉगिंग ट्रॅकचे काम कोणासाठी? : मनोज मेहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com