
नवी मुंबई : आपले शिक्षण सुरू ठेऊन आईवडिलांना घर खर्चाला आर्थिक मदत मिळावी म्हणून जयश्री दळवी या विद्यार्थीनींने दिवाळीसाठी लागणारे रंगबिरंगी दिवे बनविण्यास सुरुवात केली असून त्याची ऑनलाइन विक्री करत आहेत.
कोरोनाच्या महामारीत बऱ्याच जणांच्या रोजगारावर परिणाम झाला असून कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकने अवघड बनले आहे. मात्र याकाळात ही निराश न होता येणाऱ्या सणांकडे एक व्यवसायिक दृष्टिकोन म्हणून पाहत आणि आपल्या आईवडीलांना आर्थिक मदत कशी होईल हें पाहुन जयश्री दळवी या विद्यार्थिनीने रंगबिरंगे दिवे बनविण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील वृत्तपत्र दैनिक धावते नवनगरमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल पंडित दळवी यांची ही कन्या आहे. सध्या ती वाशी सेक्टर १० येथील राजीव गांधी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये १५ वीमध्ये शिकत आहे. सध्या कॉलेज बंद आहे.
मात्र कोरोना काळात वडिलांना आर्थिक मदत होण्यासाठी घरी दिवाळीचे दिवे दसऱ्यापासून बनवायला सुरूवात केले असून इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप्पच्याद्वारे ऑनलाईन दिवे विक्रीसाठी दिव्यांचे फोटो पाठवण्यात आले आहेत. एक दिव्याला कलर्स, डायमंड आणि मोती लावायला कमीत कमी १० ते १५ मिनिट लागतात. जयश्री दळवीच्या दिवे बनवण्याच्या कामाला त्याच्या आई वडील, वहिनी आरोही विक्रम दळवी, मैत्रिणी वैशाली दळवी, प्रियंका लोखंडे, रोहिनी दळवी, सोनाली भिडे, मनिषा भिडे आणि दिपीका भिडे तसेच मुलगा द्रोण दळवी यांनीही मदत केली. आतापर्यंत जयश्रीने अंदाजे ८५० च्या वर दिवे बनविले आहे. व्हाट्सअप्प आणि इंस्टाग्राम वर दिवे विकत घेण्यासाठी उल्हासनगर, लोढा-डोंबिवली आणि नवी मुंबईतुन अतिशय उत्तम असा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.