• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2020

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ वाशी-सानपाड्यात इंटकची निदर्शने

adminbyadmin
in Uncategorized
0
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी  धोरणाच्या निषेधार्थ वाशी-सानपाड्यात इंटकची निदर्शने

नवी मुंबई : केंद्र सरकारकडून  गेल्या काही महिन्यापासून सातत्याने घेण्यात  येत असलेल्या कामगारविरोधी धोरणाचा गुरूवारी (दि. २६) नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील महापालिका रूग्णालय व सानपाडा येथील नागरी आरोग्य केंद्रात तसेच एमआयडीसी परिसरात व इतर विविध ठिकाणी कामगारांनी निदर्शने केली.

गुरूवारी  सकाळी ११ वाजता वाशीतील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयात सर्वप्रथम नवी इंटकच्यावतीने कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली रूग्णालयाच्या कामगारांनी निदर्शने केली.  या निदर्शन  कार्यक्रमात रूग्णालयीन कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रवींद्र सावंत यांनी ‘रद्द करा, रद्द करा, कामगारविरोधी काळे कायदे रद्द करा, अशा घोषणा  दिल्या. त्यापाठोपाठ निदर्शने  करणाऱ्या कामगारांनीही मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या.  या निदर्शन कार्यक्रमात कामगारनेते रवींद्र सावंत यांच्यासमवेत वाशी हॉस्पिटल वॉर्ड बॉय संघटनेचे अध्यक्ष सुहास म्हात्रे, बहूउद्देशीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष कमलेश आठवले, इंटकप्रणित माथाडी  संघटनेचे नेते दिनेश गवळी, कुणाल खैरे, मनीष महापुरे, संग्राम इंगळे आदी सहभागी झाले होते. रूग्णालयीन परिसरात रूग्णांना निदर्शन कार्यक्रमाचा त्रास होणार नाही याची इंटकच्या पदाधिकाऱ्यांकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.

यावेळी निदर्शन कार्यक्रम संपल्यावर कामगार नेते रवींद्र सावंत यांनी गेल्या काही वर्षापासून केंद्राच्या कामगारविरोधी धोरणामुळे कामगारांची वाताहत झाली आहे. बेरोजगारीत वाढ झाली आहे. कायम कामगारांच्या कायम सेवेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमित काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची कायम सेवा व्हावी, कामगारविरोधी लेबर कोड त्वरीत मागे घ्या, कामगार व शेतकरीविरोधी  केलेले काळे कायदे रद्द करावेत यासह अन्य मागण्यांसाठी व कामगारांवर केंद्राकडून होत असलेल्या अन्यायाचा आणि उद्योजकधार्जिणे निर्णय घेवून कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या कृत्याचा निषेध करत असल्याचे सांगितले.

वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील आंदोलन संपताच अवघ्या ५-१० मिनिटातच नवी मुंबई इंटकच्या वतीने कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली सानपाडा येथील महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासमोर निदर्शने करण्यात आली. यात नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातही इंटकच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.

Previous Post

पाठपुरावा करूनही विकासकामे होत नसल्याने दिला अखेर निदर्शन करण्याचा गणेश भगतांनी इशारा

Next Post

नवीन पनवेल, करंजाडे पाणी प्रश्नावर पनवेल संघर्ष समितीने अधिकाऱ्यांना विचारला जाब

Next Post
नवीन पनवेल, करंजाडे पाणी प्रश्नावर पनवेल संघर्ष समितीने अधिकाऱ्यांना विचारला जाब

नवीन पनवेल, करंजाडे पाणी प्रश्नावर पनवेल संघर्ष समितीने अधिकाऱ्यांना विचारला जाब

आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची इंटकची मागणी

नवी मुंबईत आज कोरोनाने 2 मृत्यू तर कोरोनाचे नवे 151 रूग्ण

कोव्हिड सेंटरमधील यंत्रणा सक्षम ठेवण्याविषयी लोकनेते गणेश नाईकांची महापालिकेला सूचना

कोव्हिड सेंटरमधील यंत्रणा सक्षम ठेवण्याविषयी लोकनेते गणेश नाईकांची महापालिकेला सूचना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com