
नवी मुंबई : निर्मला महिला मंडळांकडून नेरूळ व जुईनगरमधील महिला वर्गासाठी चालविण्यात येणाऱ्या मोफत क्लासेसचे उद्घाटन कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्याकडून मंगळवारी (दि. १ डिसेंबर ) सकाळी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संतोष शेट्टी यांच्यासह शिवसेनेचेही पदाधिकारी उपस्थित होते.
नेरूळ व जुईनगरमधील महिलांना स्वंयरोजगाराच्या व व्यवसायाच्या माध्यमातून स्वबळावर उभे राहावे व त्यातून आपल्या कुटूंबाचाही आर्थिक भार उचलावा या हेतूने निर्मला महिला मंडळाकडून शिवण क्लास, मेंहदी क्लास, बेसिक पार्लर क्लास, कुकरी क्लासचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कॉंग्रेसच्या नवी मुंबई सचिव विद्या भांडेकर व नेरूळ तालुका कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. गौरी रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लासेस आयोजित करण्यात आले असून या क्लासेसचा मंगळवारी शुभारंभ झाला.
या उद्घाटन कार्यक्रमास कॉंग्रेसच्या नगरसेविका मिरा पाटील, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीपभाऊ घोडेकर, उपशहरप्रमुख गणेश घाग, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख राजु पुजारी, काँग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर, कॉंग्रेसचे नेरूळ तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, सनी डोळस, मनीष महापुरे, सुशांत लंबे, विवेक सावंत, गौरव महापुरे, स्वप्निल सौरटे, ऋषीकेश राऊत, सौ. शेवंता मोरे, सौ. मंगल बगाडे, सौ. सारीका धोंडे, सौ. शीतल सावंत, सौ. श्वेता लंबे, पुनम कांबळे, सौ. सीमा वाघ, सौ. विमल कांबळे, स्मिता सालगुडे, सौ. सविता गुजर, दीपाली नलावडे उपस्थित होते.
क्लासेसमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना केकचे प्रशिक्षण सौ. अर्चना भिलारे, शिवण क्लासचे प्रशिक्षण सौ. सुनिता शिंदे, शिवण क्लासचे प्रशिक्षण विजयालक्ष्मी आचार्य, मेहंदीसाठी प्रशिक्षण कु. पूनम कांबळे देणार आहेत. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विद्या भांडेकर यांनी केले.