• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 2, 2020

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी खा. राजन विचारेंना साकडे

adminbyadmin
in Uncategorized
0
खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाण्यातील जलवाहतूक पुढील पावसाळ्या अगोदर होणार सुरु

नवी मुंबई : ठोक मानधनावर वर्षानुवर्षे नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा कायम व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी स्थानिक शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करावेत यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी त्यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदनातून साकडे घातले आहे.

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी कामगार नेते रवींद्र सावंत सतत महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या विधानभवनातील दालनात मागे महापालिका आयुक्त व अधिकारी तसेच नगरविकास खात्याचे अधिकारी यांची या विषयावर सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे पटोळे यांनी बैठकही घडवून आणली होती. सावंत यांनी अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा कायम झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या तसेच राज्य सरकारच्या निदर्शनासही आणून दिले होते. यानंतर महापालिका प्रशासनाने कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या परिश्रमाची दखल घेताना ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवून दिला.

या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी कामगार  नेते रवींद्र सावंत यांनी नाना पटोळे, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटिवार या मातब्बरांकडे सतत निवेदने व भेटीगाठीतून पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री व  ठाण्याचे पालकमंत्री तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेवून त्यांनी याप्रकरणी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे संबंधितांना साकडे घातले. शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची रवींद्र सावंत यांनी मंगळवारी सांयकाळी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेवून निवेदन सादर करताना मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करण्याचे साकडे घातले. यावेळी सावंत यांच्यासमवेत कॉंग्रेसचे प्रदेश चिटणिस संतोष शेट्टीही उपस्थित होते.

कामगार नेते रवींद्र सावंत हे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेला सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची व नेतेमंडळींची भेट सतत भेट घेतल्याने या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरात  लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Previous Post

निर्मला महिला मंडळाच्या मोफत क्लासेसचे कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून उद्घाटन

Next Post

छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान व कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यानातील समस्या सोडविण्याची रतन मांडवेंची मागणी

Next Post
छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान व कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यानातील समस्या सोडविण्याची रतन मांडवेंची मागणी

छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान व कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यानातील समस्या सोडविण्याची रतन मांडवेंची मागणी

जनतेची नि:स्वार्थीपणे कामे करण्याच्या सेवाभावाची गरज : नामदेव भगत

जनतेची नि:स्वार्थीपणे कामे करण्याच्या सेवाभावाची गरज : नामदेव भगत

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

महाविकास आघाडीच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेकडून ‘अभय योजना’ जाहिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com