
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या कायम सेवेबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. ठोक मानधनावरील कामगारांची सेवा कायम व्हावी व त्यात ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांचाही समावेश असावा यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव राज्य सरकारकडे महापालिका प्रशासनाने पाठविला असल्याची प्रतिक्रिया ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम होत असताना नवी मुंबई महापालिकेनेही ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करावी यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासन व मंत्रालयादरम्यान सातत्याने पाठपुरावाही केला. अधिवेशनादरम्यान हा प्रश्न अन्य आमदारांच्या माध्यमातून उपस्थित करताना कामगार नेते रवींद्र सावंत ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेकडे राज्य सरकारचे लक्षही वेधून घेतले होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांनी या विषयावर नवी मुंबई इंटकचे पदाधिकारी तसेच रवींद्र सावंत आणि महापालिका आयुक्तांसह महापालिका अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी यांचीही या विषयावर विधानभवनात त्यांच्याच दालनात बैठकही घडवून आणली होती. रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी राज्य सरकारकडे प्रस्तावही पाठवून दिला. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळावी म्हणून बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटिवार या कॉंग्रेसच्या मातब्बरांसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या भेटीगाठी घेवून राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेवून त्यांनाही सहकार्य करण्याचे साकडे घातले आहे. नवी मुंबई पातळीवर शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांची भेट घेवून याप्रकरणी सहकार्य करण्याची त्यांना गळ घातली आहे.
तथापि महापालिकेने ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवा करण्याविषयीच्या प्रस्तावामध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश नव्हता. संबंधित शिक्षकांनी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेरूळ येथील कार्यालयात धाव घेवून संबंधित प्रस्तावामध्ये आपल्याही कायम सेवेचा समावेश असावा असे त्यांना साकडे घातले. कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पुन्हा महापालिका प्रशासनाकडे धाव घेत ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या या विषयावर अनेकदा भेटीगाठी घेत शिक्षकांच्या प्रस्तावाबाबत वारंवार मागणी केली, साकडे घातले. अखेरिला ठोक मानधनावर काम करणाऱ्या १३८ शिक्षकांच्या कायम सेवेबाबतचा प्रस्ताव १५ डिसेंबर २०२० रोजी राज्य सरकारकडे पाठविला व १६ डिसेंबर २०२० रोजी नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांना लेखी पत्रान्वये ‘आपल्या मागणी व पाठपुराव्यानुसार’ संबंधित शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले.