
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ परिसरात बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून शनिवार, दि. १९ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक गणेशदादा भगत आणि स्थानिक भाजपा नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर १६ मधील भाजपा नगरसेविका जनसंपर्क कार्यालय, सेंचुरी सोसायटी, ए-६, ०:१४, सेक्टर-१६, छत्रपती संभाजी राजे उद्याना शेजारी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. तसेच शिबिरात मोफत औषधेही देण्यात येणार आहेत. नेरूळ सेक्टर १६, १६अ आणि १८ मधील रहीवाशांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवक गणेशदादा भगत आणि स्थानिक भाजपा नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केले आहे.