
नवी मुंबई : थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी (दि. २० डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र. ८५ च्या वतीने नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील वीर तानाजी मालुसरे मैदान व राजमाता जिजाऊ उद्यानाची साफ सफाई करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून बाबांना स्वच्छता अभियान राबवून कृतीतून अभिवादन केले.
यावेळी रा. काँ.पा. प्रदेश सरचिटणीस (व्यापार व उद्योग विभाग) प्रमोद सोळसकर, समाजसेविका सौ. सुषमाताई पवार, वॉर्ड क्र. ८५ चे अध्यक्ष यशवंत मोहिते साहेब, वॉर्ड क्र ८६ चे अध्यक्ष प्रमोद शेळके, राजेंद्र कोरडे, संतोष लोंढे, रवि पवार, रोहीदास हाडवळे, रवींद्र सुर्वे, भीमराव चांगुने, संदीप मोरे वॉर्ड, क्र. ८५ युवक अध्यक्ष निखील हांडे, युवक कार्याध्यक्ष मुकुंद पवार, युवक वॉर्ड सरचिटणीस सुरज पोळ, संदेश शिंदे, संतोष मुके, विजय शेलार, रोहन वाघ, तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.