
नवी मुंबई : प्रभाग क्रं ८५ मध्ये नेरूळ सेक्टर ६च्या रहीवाशांकरिता, सारसोळे गाव आणि कुकशेत गावाच्या ग्रामस्थांकरिता आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून दोन दिवसाकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहीवाशी व ग्रामस्थांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले.
हे शिबिर आयोजनासाठी स्थानिक प्रभाग ८५च्या उच्चशिक्षित नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या पुढाकाराने व नवी मुंबई भाजपाचे युवा जनहितैषी नेतृत्वसुरज पाटील आणि प्रभाग ८६च्या भाजपा नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर पार पडले. गुरूवारी (दि. १७ नोव्हेंबर) कुकशेत गावातील भाजप जनसंपर्क कार्यालयातआणि शुक्रवारी (दि. १८ नोव्हेंबर) नेरूळ सेक्टर सहा येथील जनसंपर्क कार्यालयात हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कोरोनाचे सावट अजूनही काही प्रमाणात असताना कोरोना महामारीच्या धक्यातून अजून रहीवाशी व ग्रामस्थ बाहेर निघालेले नसतानाही दोन दिवसीय आरोग्य शिबिरात रहीवाशी व ग्रामस्थांनी सहभागी होत स्वत:ची आरोग्य तपासणी करून घेतली. या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी रहीवाशांनी सहभागी व्हावे आणि स्वत:च्या प्रकृतीबाबत माहिती करून घ्यावी यासाठी प्रभाग ८५च्या उच्चशिक्षित नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी स्वत: रहीवाशांशी संपर्क साधून आरोग्य शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. नागरी समस्या निवारणाचे व नागरी सुविधा पुरविण्याचे काम सर्वच नगरसेवक करतात, पण रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेणारी तसेच आरोग्य शिबिरात सहभागी होवून प्रकृतीची तपासणी करून घेण्यासाठी रहीवाशांना आग्रह करणारी नगरसेविका नवी मुंबईत प्रथमच पहावयास मिळत असल्याची प्रतिक्रिया शिबिरात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी व रहीवाशांनी व्यक्त केली.