
नवी मुंबई : भाजपाचे सानपाड्यातील युवा नेतृत्व पांडुरंग आमले यांच्या पुढाकारातून साईभक्त महिला फाऊंडेशनच्या वतीने प्रभाग ७६ मधील महिलांकरीता मोफत शिर्डी व सप्तशृंगी दर्शन घडविण्यात आले.
बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून व समाजसेवक पांडुरंग आमले साहेब यांच्या वतीने दिनांक १६ व १७ डिसेंबर २०२० रोजी साईभक्त फाउंडेशनच्या सदस्यांचे शिर्डी आणि वणी या देवदर्शनांचे मोफत आयोजन करण्यात आले होते. या देवदर्शनात सानपाडा प्रभाग ७६ मधील महिला भक्तीभावाने सहभागी झाले होते. सहभागी महिलांना पांडुरंग आमले यांच्या वतीने शिर्डी येथे साई चरित्र ग्रंथाची भेट देण्यात आली. या देवदर्शनासाठी महिलांना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आ. मंदाताई म्हात्रे सातत्याने पांडुरंग आमलेंना फोनच्या माध्यमातून संपर्क करत महिलांच्या प्रवासाबाबत चौकशी करत होत्या.