• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 3, 2021

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे – नवी मुंबई मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे – नवी मुंबई मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. मुळात पालकमंत्री म्हणून अशी मागणी करताना नवी मुंबईकरांचा कानोसा घेणे आवश्यक होते, तो त्यांनी घेतला नाही याबद्दल खेद वाटतो. तरी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी ठाम भूमिका मनसे शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी घेतली आहे.

मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई करांमधून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. नवी मुंबईतील जमिनी जेव्हा जे एन पी टी, सिडको १९८० च्या दरम्यान ताब्यात घेत घेऊन शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना अत्यंत एकरी केवळ १० ते २० हजार रुपये मोबदला दिला जात होता. स्व. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा लढा उभारण्यात आला. १९८४ च्या प्रसिद्ध उरण परिसरातील आंदोलनात ५ जण शहिद झाले. आंदोलनाची तीव्रता बघून सरकारने १८९४ चा ब्रिटिशकालीन अन्यायकारक भूसंपादन कायदा बदलून नवीन कायदा केला आणि भूमिपुत्रांना १२.५% जमीन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लोकनेते दि बा पाटील यांनी आगरी कोळी समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, महाविद्यालये उभी केली. दि. बा. पाटील विधानसभेत ४ वेळा आमदार, विरोधी पक्षनेता होते. तसेच लोकसभेत दोन वेळा खासदार होते. दोन्ही सभागृहातील त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी होती. नवी मुंबईतील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून नवी मुंबई विमानतळाकडे बघितले जाते. त्यामुळे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळासाठी योग्य असल्याचे नवी मुंबईकरांचे मत आहे.

मंत्री एकनाथजी शिंदे यांची सर्वसामान्यांशी नाळ तुटताना दिसत आहे. विमानतळासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जमिनी संपादन करताना दिलेली आश्वासने सिडको पाळत नाही. या प्रश्नांवर न बोलता नगरविकास मंत्री नामकरणाच्या विषयात एकनाथ शिंदे का लक्ष घालत आहेत, याचा जाब मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमहोदयांना विचारणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाळ भांड्वलदारांशी जुळवून घेतली नाही ना असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडत आहे.

मागील अनेक वर्षांपासून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, हि मागणी जोर धरत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे अचानक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी करून जे राजकारण करत आहेत, ते निंदनीय आहे. लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, हि मागणी अनेक संघटनांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्री यांना पत्र देऊन केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे समस्त मराठी जणांचे मानबिंदू आहेत. त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी समस्त मराठी जणांची अपेक्षा आहे. परंतु मागील सहा वर्षात शिवसेना राज्यात सत्तेत असूनही स्व. बाळासाहेबांचे स्मारक बनवू शकली नाही, हि दुर्दैवाची बाब आहे. अशा वेळी स्मारकाचे काम लवकर कसे होईल इकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देणे जरुरी आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात महाराष्ट्रात होणारा एखादा भव्य प्रकल्प असेल त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे आणि स्व. बाळासाहेबांचा यथोचित गौरव करणे अपेक्षित आहे.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देऊन आणि भविष्यात महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या, भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन, तसेच स्व. बाळासाहेबांचे स्मारक लवकर पूर्ण करून दोन्ही महापुरुषांचा योग्य सन्मान राखला जाईल. तशी मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी अशी विनंती नवी मुंबई मनसेच्या वतीने शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.

यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सहसचिव दिनेश पाटील, अभिजीत देसाई,,विभाग अध्यक्ष भूषण कोळी, योगेश शेटे, अमोल आयवळे, रोज़गार व स्वयंरोज़गार नवी मुंबई अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, शारिरिक सेना अध्यक्ष सागर नाइकरे,विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोज़गार व स्वयंरोज़गार उपशहर अध्यक्ष अनिकेत पाटील,उपविभाग अध्यक्ष युवराज मनसुख उपस्थित होते.

Previous Post

सावित्रीबाई फुले यांची जयंती शेकाप कार्यालयात साजरी

Next Post

आयुक्तांच्या निर्देशानंतर १० दिवसातच नेरूळ रूग्णालयाची रेकॉर्ड रूम अद्ययावत

Next Post
आयुक्तांच्या निर्देशानंतर १० दिवसातच नेरूळ रूग्णालयाची रेकॉर्ड रूम अद्ययावत

आयुक्तांच्या निर्देशानंतर १० दिवसातच नेरूळ रूग्णालयाची रेकॉर्ड रूम अद्ययावत

रविंद्र इथापे हा विकासकामांसाठी झपाटलेला नगरसेवक : आ. गणेश नाईक

रविंद्र इथापे हा विकासकामांसाठी झपाटलेला नगरसेवक : आ. गणेश नाईक

२३ तारीख आली, पगार देणार तरी कधी?

मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन द्या : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com