संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर
येत्या दि. ६ जुलै रोजी आझाद मैदानात पदोन्नती मधील आरक्षण या सह विविध मागण्यांसाठी
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निदर्शने आंदोलन
अयोजित करण्यात आले आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी
दिली आहे.
अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीयांना
पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे; मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा
कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण
टिकलेच पाहिजे. जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला ५ टक्के
आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे दि.
६ जुलै रोजी दुपारी १ वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे
अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे.