संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून रविवारी (दि. ३ जुलै) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सानपाडा नोडमधील भाजपाचे सर्व बुथप्रमुख व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय कार्यक्रमाच्या वृत्तसंकलनासाठी आलेल्या महिला पत्रकारांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्या व समाजसेविका सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी स्वत:च्या वाढदिवसाला इतरांप्रमाणे बॅनरबाजीची स्टंटबाजी न करता वात्सल्य ट्रस्टमधील मुलांना अन्नधान्याचे वाटप करताना कृतीतून समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
महाराष्ट्र प्रदेश यांनी दिलेल्या डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांच्या समृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताह या कार्यक्रमाअंतर्गत शेवटच्या टप्प्यातील बुथस्तरावर वृक्षारोपण उपक्रम रविवार दिनांक ४ जुले २०२१ रोजी प्रभाग क्रमांक ७६ मध्ये दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला होता. स्थानिक भागातील बुथ प्रमुखांच्या हस्ते तसेच वृत्तसंकलनासाठी आलेल्या महिला पत्रकारांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. स्वस्तिक नर्मदा सोसायटीच्या बाजूला, नवरत्न सोसायटीच्या बाजूला, प्रियांका सोसायटीच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. पांडुरंग आमले यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्थानिक रहीवाशी असलेल्या शिक्षिका रंजना चौगुले, स्वस्तिक नर्मदा सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार पोवार, भाजपाचे सानपाडा मंडळ महामंत्री रमेश शेट यांनी वृक्षारोपणाच्या वेळी समयोचित भाषण करताना पर्यावरण संतुलनासाठी व आवश्यक असलेल्या ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्षारोपणाचे व वृक्षसंपदेचे महत्व समयोचित भाषणातून उपस्थितांना पटवून दिले. भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी यावेळी आभारप्रदर्शन केले.
त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्या व समाजसेविका तसेच साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा वात्सल्य ट्रस्टमधील मुलांना भाजपा पदाधिकाऱ्यांच्या व स्थानिक महिलांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते. वृक्षारोपण व अन्नधान्य वाटप कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा पदाधिकारी शशी नायर, भाजपाचे सानपाडा मंडळ महामंत्री निलेश वर्षे व रमेश शेटे, भाजपाचे आयटी सेल जिल्हा संयोजक पंकज दळवी, जिल्हा पदाधिकारी भारती मोरे, भाजपाच्या महिला मंडळ अध्यक्षा आज्ञा गव्हाणे,भाजपा महिला मंडळ सरचिटणिस मंगल वाव्हळ, जिल्हा युवा सचिव दिपिका बोमणे, मंडळ पदाधिकारी संचिता जोईल, मंडळ उपाध्यक्ष सुनिल शिंदे, वॉर्ड अध्यक्ष भार्गव माळी, जिल्हा सदस्य अशोक विधाते, बुथ अध्यक्ष प्रतिभा पवार, कविता काशिद, श्रीपाद पत्की, विश्वास कणसे, बुथ अध्यक्ष अनिल पाटील, रंजना चवरे, इंगवले, अॅड. गभाले, जयेश मिस्त्री, नंदकुमार पोवार यांच्यासह साईभक्त महिला फांऊडेशनच्या सदस्या, साईभक्त, स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.