संदीप खांडगेपाटील : 8369924646 – 9820096573
मुंबई : महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमध्ये आ. आशिष शेलारांचे नाव एक आक्रमक नेता म्हणून घेतले जाते. मुंबई मनपामध्ये व मुंबई शहरामध्ये शिवसेनेला अंगावर घेण्यात भाजपा वर्तुळात क्रमांक एकचे नेते म्हणून आशिष शेलारांच्याच नावाचा उल्लेख होत असतो. आक्रमक धाटणीच्या चेहरा हा एक संवेदनशील मनाचा, भावनिक नेता असल्याचे आ. शेलारांच्या कृतीतून दिसून येते. कोकच्या पूरस्थितीची पाहणी करताना कोणी फोटोसेशन केले तर कोणी अधिकाऱ्यांवर आपल्या पदाचा ‘माज’ दाखविण्यात समाधान मानले. परंतु संवेदनशील मनोवृत्तीचे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी वाचन मंदिराला पुस्तकांची भेट देत एका आगळ्यावेगळ्या स्वभावाचे दर्शन घडविले.
कोकणात पुराने मालमत्तांची, तसेच मनुष्य हानीही झाली. अनेक संसारही उध्दवस्त झाले. त्याचबरोबर वाचनालयांचे ही मोठे नुकसान झाले. त्यामुळे संसार उभे राहत असताना, नव्याने कोकण सावरत असताना वाचनाची आवड असणाऱ्या कोकणवासियांचे नुकसान होवू या हेतूने आ. आशिष शेलार यांनी 650 पुस्तके चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट देऊन वाचनालय पुन्हा उभे रहावे म्हणून छोटा प्रयत्न केला. ग्रंथालये उभी राहिली की, शहर पुन्हा उभे रहायला वेळ लागणार नाही, अशी विनम्र भूमिकाही यावेळी आ. आशिष शेलार यांनी मांडली.