संपादक : संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : : कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईत पाण्याच्या टाकीची (जलकुंभाचा) सुरक्षा हा विषय ऐरणीवर आलेला आहे. पाण्याच्या टाक्या या सिडकोकालीन असल्याने त्यांचा पुर्नविचार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. कोपरखैराणे सेक्टर २३ मध्ये आकाशगंगा सोसायटीच्या पाठीमागील बाजूस महापालिकेची पाण्याची टाकी आहे. या टाकीचे बांधकामही १९९३-९४चे आहे. आज जवळपास या टाकीच्या बांधकामाला अडीच दशकाहून अधिक कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे या पाण्याच्या टाकीचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाकीची जर दुर्घटना झाली तर बाजूच्या निवासी परिसराला त्याची किंमत मोजावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात पाण्याच्या टाकीबाबत घडलेल्या घटना पाहता कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीची बांधकामाची सुरक्षा जाणून घेण्यासाठी संबंधितांना या पाण्याच्या टाकीचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.