सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्यांची डागडूजी करण्याची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ., रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए, सेक्टर १८ या परिसराचा समावेश होत आहे. गणेशोत्सव आता अवघ्या १० दिवसावर आलेला आहे. गणेशोत्सवाअगोदर प्रभागातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे व रस्त्यांची डागडूजी करण्यात यावी. रस्त्यावरील खड्ड्यामुळे गणेशोत्सव कालावधीत कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी लवकरात लवकर हे काम करण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.