नवी मुंबई : प्रभाग ८२ व ८४ मधील नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमध्ये डास र्निमूलन मोहीम राबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त व पालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८२ व ८४ मधील नेरूळ सेक्टर २ व ४ मध्ये तसेच जुईनगर नोडमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. डासांची घनता वाढली असून स्थानिक रहीवाशांना त्यामुळे साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. साथीचा आजार झाल्यावर लोक खासगी दवाखाने व रूग्णालयात उपचार घेतात व त्याविषयी पालिका प्रशासनाला काहीही माहिती नसल्याने साथीच्या आजाराचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास येत नाही. या दोन प्रभागात डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी सातत्याने व्यापक प्रमाणावर डास र्निमूलन मोहीम राबविणे आवश्यक आहे. सोसायटी आवारात, एलआयजीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.