महापालिका प्रतिनिधी : मनिष चव्हाण : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मधील पथदिव्यांची पाहणी व तात्काळ दुरूस्ती करण्याची लेखी मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमध्ये असलेल्या महापालिका प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३, ४, ८चा समावेश होत आहे. या परिसरात पथदिव्यांची समस्या गंभीर झाली असूनम अनेक भागात रहीवाशांना अंधारात ये-जा करावी लागत आहे. अनेक भागात पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणी पथदिव्यांची दुरावस्था झाली आहे, अनेक पथदिवे नावालाच अस्तित्वात असून त्यावर प्रकाश देणारे बल्बचा बॉक्सच उपलब्ध नाहीत. सानपाडा सेक्टर ८ मधील कोहीनुर सोसायटीच्या जवळील पथदिव्याचा बल्ब असलेला बॉक्स अडीच महिन्यापूर्वी पावसाळ्यात वाऱ्यामुळे पडला असून तो आजतागायत बंदच आहे. या पथदिव्याच्या दुरुस्थीबाबत अडीच महिन्यात पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रभागात अंधारामुळे वाटमारी, लुटमार, छेडछाड व विनयभंग अथवा अन्य काही दुर्घटना घडण्याची भीती आहे. अशा घटना घडल्यास त्यास महापालिका प्रशासनाची पथदिव्यांच्या देखभालीबाबतची उदासिनताच कारणीभूत राहील. या पार्श्वभूमीवर प्रभाग ७६ मधील रहीवाशांच्या पथदिव्यांबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष अभियान राबवून संबंधितांना सर्वच पथदिव्यांच्या दुरूस्तीचे आदेश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.