सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे माजी नगरसेवक संदीप सुतार यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची भेट घेतली. वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात व नेरुळमधील माता बाल रूग्णालयात एम आर आय व सी टी स्कॅन मशीन स्थापित करण्याचे निवेदन त्यांनी दिले. संदीप सुतार यांच्या मागणीवर आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.