बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोरांचा व गर्दुल्यांचा उपद्रव वाढीला लागला असून त्याचा त्रास स्थानिक रहीवाशांना सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चोऱ्यांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. नेरूळ पोलिसांनी या भुरट्या चोरांचा व गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.
काही दिवसापासून तीन महिला व दोन मुले अशी एक भुरट्या चोरांची टोळी परिसरात फिरत असल्याचे स्थानिक परिसरातील सोशल मिडियावर ‘व्हायरल’ही झाले आहे. काही इमारतीच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांचे चेहरेही स्पष्टपणे दिसत आहे. तसेच बांधकाम ठिकाणाहून लोखंडी साहित्य, सिमेंटच्या गोणी तसेच अन्य साहित्य चोरीला जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्री साडेदहा-अकरा वाजता गर्दुले बांधकाम साहित्य नेत असतानाही त्यांच्याकडे हत्यार असण्याच्या भीतीने त्यांना अडविण्याचे धाडस कोणी करत नाही. सारसोळे गावातही चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून भुरट्या चोरांचा व गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.