नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर ७ मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने बसविलेले ओपन जीममधील साहित्याची दुरावस्था झालेली आहे. साहित्य नादुरूस्त झाली आहेत. या साहित्याची लवकरात लवकर दुरूस्त झाली तर स्थानिक रहीवाशांना ओपन जीमच खऱ्या अर्थाने वापर करणे शक्य होईल. या मैदानात एका ठिकाणी असलेल्या गवतावर स्थानिक परिसरातील महिला सकाळच्या वेळी योगा करण्यात येत असतात. परंतु सकाळी उद्यानातील गवतावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने महिलांना योगा करणे शक्य होत नाही. त्यांनी योगासाठी आणलेले मॅट भिजत असल्याने योगा करता येत नाही. महापालिका प्रशासनाने त्या गवतावर सकाळी १० नंतर अथवा दुपारनंतर पाणी मारल्यास सकाळच्या वेळी परिसरातील महिलांना या ठिकाणी योगा करणे शक्य होईल. या ठिकाणी ओपन जीममधील साहित्याची डागडूजी तसेच उद्यानातील पाण्याची वेळ बदलण्यास संबंधितांना सहकार्य करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.