संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील कै. सिताराम मास्तर उद्यानातील अपुरा वीज पुरवठा व माफक प्रमाणावर असलेली सुरक्षारक्षकांच्या उपलब्धतेची गरज या समस्या सोडविण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमध्ये सेक्टर ७ मध्ये कै. सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात सकाळी ६ वाजल्यापासून ते थेट रात्री १२ पर्यत स्थानिक रहीवाशांचा वावर आपणास दिसून येईल. या उद्यानात चांगल्या प्रकारे वृक्षसंपदाही आहे. महापालिका प्रशासनाने येथे पथदिवे व छोटेखानी हायमस्टच्या माध्यमातून वीज उपलब्ध केली असली तरी उद्यानाच्या जागेच्या तुलनेत हा उजेड कमीच आहे. त्यामुळे उद्यानात अनेक भागात कमी प्रकाश, तर कोठे अंधार पहावयास मिळतो. उद्यानाचा विस्तिर्णपणा पाहता पालिका प्रशासनाने अजून पथदिवे व हायमस्ट वाढविणे आवश्यक आहे. जेवण झाल्यावर चालण्यासाठी येथे रात्री स्थानिक भागातील महिला, पुरूष व ज्येष्ठ नागरिकही येत असतात. अंधाराचा फायदा घेवून या उद्यानात समाजविघातक शक्ती महिलांचा विनयभंग, छेडछाड , लुटमारही करू शकतात. अधिकाधिक व माफक प्रमाणात उजेड असला तर चुकीच्या घटना घडण्याची शक्यता नाही, असे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
या उद्यानाच्या तुलनेत सुरक्षारक्षकही पालिका प्रशासनाने वाढविणे आवश्यक आहे. सकाळी ६ ते रात्री १२ पर्यत उद्यानात असलेली वर्दळ पाहता येथे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून महापालिका प्रशासनाने या उद्यानाचा विस्तिर्णपणा लक्षात घेवून सुरक्षारक्षक तात्काळ वाढवावे. स्थानिक रहीवाशांकडून उद्यानात वाढीव वीजेची व सुरक्षारक्षकांची मागणी केली जात असून संबंधितांना उद्यानातील या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
००००००००००००००००००००००० ०००००००००००००००००००००००००००००००००००००० ००००००००००
नवी मुंबई लाईव्हचे कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७/३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई