नवी मुंबई : मार्च महिन्याची १४ तारीख उलटली तरी महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे अजून पालिका प्रशासनाकडून तसेच वर्षानुवर्षे एकाच ठेकेदाराला कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या ठेकेदाराकडून वेतन झालेले नाही. मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतन विलंबाची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
आज मार्च महिन्याची १४ तारीख. महापालिका प्रशासनातील कायम संवर्गातील अधिकारी व कर्मचारी, तसेच ठोक व कंत्राटी संवर्गातील कर्मचारि व अधिकारी यांचे वेतन झाले आहे. मात्र सालाबादप्रमाणे आज मार्च महिन्याची १४ तारीख उलटली तरी मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. तसेच गेली अनेक वर्षे एकाच ठेकेदाराला मूषक नियत्रंणचा ठेका दिला जात आहे. ठेकेदार तीन ते चार महिनेही वेतन विलंब करून करूनही त्याच ठेकेदाराला पुन्हा महापालिका प्रशासन ठेका देत आहे. मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करूनही त्याच ठेकेदाराला ठेका दरवर्षी दिला जातो व गेली अनेक वर्षे हाच एकमेव मूषक नियत्रंणचा ठेकेदार आहे. याचाच अर्थ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक शोषण करणाऱ्या ठेकेदाराला महापालिका प्रशासनाचा पाठिंबा आहे. कर्मचाऱ्यांचे गेली अनेक वर्षे वेतन विलंब करूनही ठेकेदाराला ठेका देणे याचाच अर्थ तू वेतन कितीही लेट दे, महापालिका प्रशासन तुझ्यासोबत आहे, असा अर्थ नवी मुंबईकरांनी घ्यायचा का? आज १४ मार्च. मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. संबंधित ठेकेदाराकडे तसेच पालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडे वेतन विलंबाची चौकशी करून महापालिका प्रशासनाने तातडीने वेतन करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.