राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी घेतली आ. मंदाताई म्हात्रेंची भेट
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८५-८६ मध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी भाजपच्या बेलापुर मतदारसंघातील आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेवून लोकांच्या समस्या निवारणासाठी आमदार निधी उपलब्ध करून साकडे घातले आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नेरूळ नोडमधील समाजसेवक महादेव पवार यांनी नेरूळ प्रभाग ८५-८६मधील समस्यांबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. पक्ष वेगळा असला तरी दोन्ही प्रभागात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान, वाहनाच्या आतील साहित्याची चोरी, वाहनातील इंधनाची चोरी, वाटमारी, लुटमार, चेन स्नॅचिंग च्या घटनांबाबत महादेव पवार यांनी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांना विस्तृत माहिती दिली.परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तपासकामात अडथळे येतात. यामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण आहे. सीसीटीव्ही बसविल्यास या कामांना आळा बसणे शक्य असल्याचे सांगून महादेव पवार यांनी नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव व कुकशेत गावात आमदारनिधीतून सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे.
पक्ष वेगळा असतानाही जनतेच्या समस्यांवर महादेव पवार यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतल्याने जनकल्याणासाठी राजकारणी एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या भेटीने व प्रभागातील जनतेसाठी सीसीटीव्ही करता आमदार निधी मागितल्याने महादेव पवार यांच्या कार्याची व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाची सर्वत्र चर्चा होत आहे.