नवी मुंबई : रामनवमीनिमित्त नेरूळ सेक्टर सहामधील शिवम सोसायटीत आयोजित साई भंडारा उत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसम सोसायटीच्या प्रागंणात साई बाबांचे मंदिर असून दरवर्षी साईभंडारा उत्सवाचे मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने आयोजन करण्यात येत असते. याही वर्षी शुक्रवार, दि. ८ एप्रिल ते रविवार, १० एप्रिल यादरम्यान या साईभंडाऱ्याचे आयोजन शिवसाई उत्सव मंडळ, संडे क्रिकेट तसेच शिवम सोसायटीच्या वतीने करण्यात आले होते. ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री. साईसद्चरित्र अखंड पारायणास प्रारंभ झाला. शनिवारी सांयकाळी ८ वाजता श्री. साईंची पालखी सोहळा विभागातून काढण्यात आला. दिघा-नवी मुंबई येथील वारकरी शिक्षण संस्थेचे पालखी भजनी मंडळाच्या भजनाचा पालखी सोहळ्यात समावेश होता. या पालखी सोहळ्यात शिवसाई उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, शिवस सोसायटीचे पदाधिकारी व रहीवाशी, संडे क्रिकेटचे सदस्य, परिसरातील रहीवाशी, स्थानिक नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख प्रल्हाद पाटील, वंचित बहूजन आघाडीचे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विरेंद्र लगाडे, युवा सेनेचे अजित खताळ सहभागी झाले होते. शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख दिलीप आमले व शाखाप्रमुख इमरान नाईक यांनी पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी पालखी मार्गावर थंड पाण्याची सोय उपलब्ध केली होती. शनिवारी सांयकाळी सुरू झालेले महाभंडारा रविवारी रात्री उशिरापर्यत सुरू होता.
रामनवमीच्या दिवशी साईबाबांचे व श्री सत्य नारायण महापुजेचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे ठाणे जिल्हास्तरीय नेते व माजी खासदार डॉ. संजीव नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, नगरसेविका सौ. जयश्रीताई ठाकूर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघठक सौ. समुद्राताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार, राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष प्रमोद शेळके, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत सोळस्कर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नेरूळमधील व विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, रहीवाशी भंडाऱ्यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे स्वागत किशोर तांबे यांनी केले.