नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ येथील नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २, ३, ४, ८ या निवासी परिसराचा समावेश होत आहे. येथील रहीवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी या निवेदनातून तक्रार करत असून या तक्रारींचे संबंधितांच्या माध्यमातून निवारण करताना संबंधित रहीवाशांना दिलासा मिळवून देणे आवश्यक आहे असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
१) गेल्या काही महिन्यापासून प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २, ३, ४, ८ या निवासी परिसरातील रहीवाशांना पाण्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पाणी कमी दाबाने येत असल्याने रहीवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
२) सानपाडा सेक्टर २, ३, ४, ८ या निवासी परिसरातील रहीवाशांना उंदरांच्या त्रासाचाही सामना करावा लागत आहे. वाहनातील वायरी कुरतडणे, दोरीवर वाळत घातलेले कपडे कुरतडणे, गॅलरीतील कुंड्यामध्ये असलेली फुले व छोटीछोटी झाडे कुरतडणे, तूळशीच्या रोपांची वाताहत करणे असा त्रास रहीवाशांना सहन करावा लागत आहे. मूषक नियत्रंण मोहीम आठ दिवसातून एकदा प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात राबविणे आवश्यक आहे.
३) प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील सर्व गटारांची महिन्यातून एकदा तळापासून सफाई करण्यात यावी, जेणे करून पाणी साचणार नाही. दुर्गंधी येणार नाही. रहीवाशांना डासांचा त्रास सहन करावा लागणार नाही.
४) काही ठिकाणी पथदिव्यातून अंधुक प्रकाश येत आहे. पथदिव्यांची वेळोवेळी पाहणी कमी प्रकाशाची समस्या संपुष्ठात आणावी.
५) सोसायटी बाहेरील मल:निस्सारण वाहिन्याची सफाई पालिका प्रशासनाकडून करण्यात येते, पण अंर्तगत नाही. मल:निस्सारण वाहिन्यामधील चोकअपची समस्या दूर करण्यासाठी दोन महिन्यातून एक वेळा प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांचीही महिन्यातून एकवेळा सफाई होणे आवश्यक आहे. ही सफाई झाल्यास मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होणार नाही, रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही.
आदी समस्या निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून देताना समाजसेवक पांडुरंग आमले यांनी या समस्यांचे निवारण करून सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.