नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना तातडीने कोव्हिड भत्ता उपलब्ध करुन देण्याविषयी महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केेली आहे.
काल, दि. १५ जुन रोजी नवी मुंबईत कोरोनाच्या नव्या रूग्णांचा आकडा ३०० पार गेला आहे, ही चिंताजनक बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने कोव्हिड भत्ता दिलेला आहे, अपवाद फक्त पालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचा. कोरोना महामारीच्या काळात व आताही मूषक नियत्रंण कर्मचारी कार्य करत आहेत. रात्र-दिवस मुषक नियत्रंण कर्मचारी काम करत असूनही पालिका प्रशासनाने इतरांना कोव्हिड भत्ता दिलेला असताना मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
एकतर मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कधीही वेतन वेळेवर मिळालेले नाही. ठेकेदार या कर्मचाऱ्यांना दोन ते चार महिने गेल्या काही वर्षापासून वेतन विलंबानेच देत आहे. अनेक वर्षे या कर्मचाऱ्यांनी अवघ्या ५ हजार हजार रुपये वेतनावर काम केल्यानंतर व या समस्या निवारणासाठी आणि कर्मचाऱ्यांना समाधानकारक वेतन मिळावे यासाठी केवळ मी एकट्याने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली आहे. एरियससाठीही पाठपुरावा केल्यावरच या कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियस जमा झालेला आहे. कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला नाही. कोव्हिड भत्ता मिळण्यास विलंब झाल्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कोव्हिड भत्ता देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे केली आहे.