अनंतकुमार गवई :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपच्या नेरूळ नोडमधील प्रभाग ९६च्या स्थानिक मा. नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या ‘श्री गणेश दिनदर्शिका २०२३’चे रविवार, दि. २५ डिसेंबरपासून विभागातील स्थानिक मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करून प्रभागात घरोघरी वाटप सुरू करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘श्री गणेश दिनदर्शिका २०२३’च्या ५००० प्रति विभागातील जनतेला घरोघरी वितरित करण्यात येणार आहेत, प्रकाशनप्रसंगी विभागातील प्रदीप कलशेट्टी, जयकुमार ढमाले, विलास विधाते, शांताराम मातेले, सुनील वायकर, अरविंद जगदाळे, आनंद कदम, सुरेश बोऱ्हाटे, अरुण थोरात, प्रताप मोरे, राजेंद्र कांबळे, सुनील गलांडे, सोपान शिंदे, आनंदराव पवार, बबन डुकरे, अशोक हाडवळे, मंगेश राऊत, बाळू हिंगे, मतकर, अशोक गांडाळ उपस्थित होते.