संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील डासांचा उद्रेक समस्या संपुष्ठात आणण्यासाठी प्रभाग ३० गृहनिर्माण सोसायटींच्या अंर्तगत भागात रात्रीच्या वेळी नियमित धूरफवारणी करण्याची लेखी मागणी समाजसेवक व सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. प्रभाग ३० मध्ये गेल्या काही दिवसांपासून डासांच्या उपद्रवाने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. डासांमुळे रहीवाशांना सांयकाळनंतर सोसायटीच्या आवारात वावरता येत नाही. दारे-खिडक्या बंद ठेवून घरात बसावे लागत आहे. डासांमुळे बाराही महिने या प्रभागात साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण पहावयास मिळतात. सानपाडा नोडमधील रहीवाशांना दिलासा देण्यासाठी प्रभाग ३० मध्ये व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबविणे आवश्यक आहे. केवळ रस्त्यावरून धुरीकरण न करता प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात तसेच पालिका उद्यानामध्ये धुरीकरण करण्यात यावे. गटारांमध्ये जंतुनाशके टाकण्यात यावी. प्रभागातील डासांच्या समस्येचे निर्मूलन करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ३० मधील रहीवाशांनी आमच्या भाजप कार्यालयात येवून केलेल्या तक्रारींनुसार, डासांचा प्रामुख्याने त्रास हा रात्रीच्या वेळीच होत असल्याने धुरीकरण मोहीम रात्रीच्या वेळी राबविल्यास डासांची समस्या संपुष्ठात येईल. डासांच्या त्रासाने रहीवाशी त्रस्त झाले आहेत. ही समस्या संपुष्ठात न आल्यास परिसरात साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती पांडुरंग आमले यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
समस्येचे गांभीर्य, साथीच्या आजाराचे अस्तित्व आणि रहीवाशांना होणारा त्रास पाहता संबंधितांना प्रभाग ३० मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात व उद्यानामध्ये व्यापक प्रमाणावर समस्येचे निर्मूलन होईपर्यत रात्रीच्या वेळी धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.