संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ या गृहनिर्माण योजनेस मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या मागणीमुळे सदर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यास २१ जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या योजनेकरिता अर्ज नोंदणी करण्यास ६ जानेवारी २०२३ ही अंतिम तारीख होती. परंतु अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता येणे शक्य होऊन, त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता ऑनलाइन अर्ज नोंदणी २१ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज २२ जानेवारीपर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरणा २४ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी ३१ जानेवारी रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी ०३ फेब्रुवारी रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत ०८ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.