विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com: ९८२००९६५७३
उरण : रात्रीच्या वेळीस पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे राहणाऱ्या एका अज्ञात इसमाने दारूच्या नशेत अजगर या जातीचा बिन विषारी साप पकडण्याचा धाडस करून त्या सापाचा खेळ करत असताना आढळला. पण तेथे उपस्थित असलेले प्रथमेश पाटील यांनी सावधगिरी बाळगत केअर ऑफ नेचर संस्थेचे सर्पमित्र पनवेल विभाग प्रमुख साजन सुनील वास्कर, कुंडेवहाळ शाखा प्रमुख स्वामी वास्कर यांना कॉल करून बोलावण्यात आले त्यांनी तो अजगर जातीचा साप व्यवस्थित पकडून वन विभागाचे अधिकारी सय्यद मुबारक यांच्या स्वाधीन करून त्यांच्या उपस्थितीत त्या अजगराला जंगलामध्ये सोडला.साजन वास्कर, स्वामी वास्कर हे सर्पमित्र असून त्यांनी आजपर्यंत अनेक मुक्या जीवांना जीवनदान दिले आहे. मानवी वस्तीत घुसलेल्या अजगराला जीवनदान दिल्याने साजन वास्कर व स्वामी वास्कर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.