नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मधील बाह्य व अंर्तगत रस्त्यांची पाहणी करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्याची व रस्त्याची डागडूजी करण्याची लेखी मागणी पांडुरंग आमले भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळा आता अवघ्या ८ दिवसांवर आला आहे. सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यांबाबत पालिका प्रशासनाने तातडीने पाहणी अभियान राबवावे, यासाठी निवेदन सादर करत असल्याचे पांडुरंग आमले यांनी म्हटले आहे.
प्रभाग ३० मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पाहणी अभियानात ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असतील अथवा रस्ते कोठे दबले गेले असतील तसेच रस्त्यावरील डांबरीकरण उखडले गेले असेल तर संबंधितांना त्या रस्त्यांची डागडूजी करण्याचे तातडीने निर्देश द्यावेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे असल्यास वाहने अडकण्याची तसेच रस्त्या सभोवतालच्या पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना स्नान घडण्याची भीती आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यांबाबत आपण संबंधितांना निर्देश देवून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची डागडूजी पूर्ण करण्याची
मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.