स्वयंम न्यूज फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुन्या सभागृहातील नेरूळ नोड परिसरातील प्रभाग ९६ मधील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची लेखी मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
पावसाळा आता अवघ्या ८ दिवसांवर आला आहे. महापालिकेच्या विसर्जित सभागृहात असलेल्या प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यांबाबत पालिका प्रशासनाने तातडीने पाहणी अभियान राबवावे, यासाठी हे निवेदन सादर करत असल्याचे सौ. रूपाली किस्मत भगत यांनी म्हटले आहे.
प्रभाग ९६ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पाहणी अभियानात ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असतील अथवा रस्ते कोठे दबले गेले असतील तसेच रस्त्यावरील डांबरीकरण उखडले गेले असेल तर संबंधितांना त्या रस्त्यांची डागडूजी करण्याचे तातडीने निर्देश द्यावेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे असल्यास वाहने अडकण्याची तसेच रस्त्या सभोवतालच्या पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना स्नान घडण्याची भीती आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ येथील नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यांबाबत संबंधितांना निर्देश देवून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची डागडूजी पूर्ण करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.