राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवारांचाही नागरी सत्कार
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिवपदी महादेव पवार यांची नियुक्ती झाल्याबाबत प्रभागातील संस्था, महिला बचत गट, सोसायटीचे पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय नेरुळ सेक्टर सहामधील डॉक्टर, कृषी अधिकारी, वकील आणि नेव्हीत कॅप्टन बनलेल्यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष नामदेव भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबई जिल्हा खजिनदार किशोर पाटील, आणि सद्गुरु पतसंस्थेचे संस्थापक समाजसेवक विरेंद्र लगाडे उपस्थित होते. कॅप्टन सुजित शिंदे, कृषी अधिकारी ऐश्वर्या कट्टे, डॉक्टर ऋषिकेश चोरगे, ॲड ऋतुजा जाधव, ॲड. अंकित कोरडे, ॲड. आरती नेवसे, ॲड. अपेक्षा पिलाने यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. प्रभागातील माझ्यावर नेहमीच प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ, तरुण आणि महिला भगिनी यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी नामदेव भगत आणि विरेंद्र लगाडे यांनी आपल्या भाषणातून महादेव पवारांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना महादेव पवार आपल्या कामाच्या बळावर तळागाळातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. दिवसातले २४ तास जनसेवेसाठी वाहून घेतलेले महादेव पवार हे या जनतेला लाभलेली देणगी आहे. महादेव पवार नि:स्वार्थीपणे काम करत असल्याने आगामी महापालिका निवडणूकीत जनताही त्यांच्या कामाची पोचपावती दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले.
या कार्यक्रमास स्थानिक रहीवाशी, गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम टाव्हरेसर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमोद शेळके यांनी केले तर आभार यशवंत मोहीते यांनी मानले.