स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील भाजपच्या वतीने नेरूळ सेक्टर सहा परिसरात वरूणा व हिमालय सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या मैदानावर विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कामाच्या व्यापामुळे अनेकांना मनोभावे इच्छा असूनही वारीत सहभागी होता येत नाही. पंढरपुरला जावून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा सर्व भाविकांसाठी तसेच नेरूळवासियांसाठी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुजाता सुरज पाटील यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून या मैदानावर माजी नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. गुरूवारी, २९ जुन रोजी सकाळी ७ वाजता ब्राम्हणांद्वारे पांडुरंगाच्या मूर्तीची विधीवत पुजा व अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यत दर्शन सोहळा व फराळ वाटप होणार आहे. सांयकाळी ६ ते १० दरम्यान सुमधुर भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे.
नेरूळमधील रहीवाशांनी, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून विठू माऊलींचे दर्शन घ्यावे व फराळाचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.