स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ, महापालिका प्रभाग ९६ मधील रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याची मागणी प्रभाग ९६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमध्ये महापालिका प्रभाग ९६चा समावेश होत असून या प्रभागात नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसराचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून सभोवताली अधिकांश सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या परिसरामध्ये अल्प व अत्यल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचे निवासी वास्तव्य आहे. या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. येथील रहीवाशांचा डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराने मृत्यू झालेला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची टांगती तलवार आहे. नेरूळ प्रबाग ९६ मधील रहीवाशांना साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन व्हावे, त्यांना घ्यावयाच्या काळजीबाबत अवगत करण्यात यावे, याशिवाय त्यांना आजार न होण्यासाठी व आजार झाल्यावर काय करावे याबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. महापालिका प्रशासनाने या नेरूळ प्रभाग ९६ मधील रहीवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांची आरोग्य तपासणी करावी, त्यांना साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ‘आरोग्य सप्ताहा’ शिबिराचे आयोजन करण्याची मागणी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.