सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ८६ सारसोळे गावच्या वार्ड अध्यक्षपदी जीवन गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते , नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते जीवन गव्हाणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
काँग्रेस नेते रविंद्र सावंत यांनी काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी पक्षबांधणी करताना प्रभाग 86च्या वॉर्ड अध्यक्षपदी जीवन गव्हाणे यांची नियुक्ती केली आहे. यावेळी कुंदन तांडेल यांचीही काँग्रेस पक्षामध्ये पदनियुक्ती करण्यात आली. पक्षप्रवेश व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाच्या वेळी प्रभाग 85चे वॉर्ड अध्यक्ष किशोर तांबे, संतोष पिंगळे, गणेश इंगवले, रोहन इंगवले, अमित पाटील, श्रीकांत सावंत, इमरान पटेल, रूषिकेश पादीर, विजय नाईक यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.
दोनच दिवसापूर्वी भाजपचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांनी ‘कोण नाना पटोले` असे वक्तव्य केल्याने काँग्रेस कमालीची आक्रमक झाली असून भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडत त्या त्या ठिकाणी काँग्रेस पक्षसंघटना आक्रमक करण्याचा इशारा यावेळी रविंद्र सावंत यांनी यावेळी दिला.
लोकांची कामे करा, नागरी समस्या सोडवा, नागरी सुविधांसाठी प्रयत्न करा. मी सदैव तुमच्यासोबत असेल. काँग्रेस पक्षसंघटना लोकाभिमुख करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल, ते सहकार्य करून दिले जाईल. काँग्रेस प्रत्येक कार्यकर्त्याच्या मदतीसाठी नाना पटोलेसाहेबांसह सर्व काँग्रेस संघटना तत्पर उपलब्ध असेल. कोण नाना पटोले असे उर्मटपणे बोलणाऱ्यांना आता आपण कृतीतून उत्तर देणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी दिला.