सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने modi@9 महा-जनसंपर्क अभियान सर्वत्र राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने रविवारी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी टिफिन बैठक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ही वयाने ज्येष्ठ असून ते ही आज तरुण वयाप्रमाणे काम करीत आहेत. आज जो मान सन्मान आपल्या देशाला मिळाला आहे तो केवळ मोदी साहेबांमुळे मिळाला आहे. आज या टिफिन बैठकीमुळे सर्व ज्येष्ठ बांधव व तरुण वर्ग इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यामुळे मला आंनद झाला की, कुठेतरी प्रथमतः आम्ही सर्व ज्येष्ठ बांधव व तरुण वर्ग एकत्र येऊन सर्वांशी चर्चा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेली कामे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेली विकास कामे यांचा अहवाल आज या टिफिन बैठक कार्यक्रमांतर्गत चर्चा करून जनतेपर्यंत पोहचविण्यात आले.
सदर टिफिन बैठक भाजपा माजी नगरसेवक दीपक पवार, वार्ड क्र. १०७, भीमा टॉवर, सेक्टर- ५० (नवीन) सीवूडस व भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले, तसेच नेरूळ सेक्टर – १८ ए, येथील समाजसेवक राजू तिकोने अशा अनेक विविध ठिकाणी टिफिन बैठक कार्यक्रम आयोजित केले होते.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांज समवेत रुपेश चव्हाण, धीरज नोटानी, अमित हरजाई, दीपक गोराणी, संदीप सरदाना, संदीप रावत, दीपक देसाई, गरिमा, शेकावत अंकल, रमेश शेटे, मंगल वाव्हळ, श्रीपाद पत्की, नाना शिंदे, साई आमले, विस्वास कणसे, सदाशिव पाटील, रमेश नरवडे, शशिकांत मोरे, भगवान भोर, मकरंद म्हात्रे, शंतनू भोपी, शरद भोर, सोनबा घोलप, प्रदीप बुरकुल, तानाजी बाबर असंख्ये कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.