गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : आज नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासून माझी मागणी होती. त्याला आज खऱ्या अर्थाने मुहर्त स्वरूप आले आहे. नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत आज दिनांक १२/०९/२०२३ रोजी सिडको व्यवस्थापकीय संचालक अनिल दिग्गिकर यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला भाजपच्या बेलापूर मतदारसंघातील आमदार मंदाताई म्हात्रे व सह व्यवस्थापकीय संचालक (१) श्री. कैलास शिंदे तसेच सह व्यवस्थापकीय संचालक (१) श्री. शंतनू गोयल उपस्थित होते.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ०१ जुन२०२३ रोजी सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल, मुंबई येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत नवी मुंबईमधील वाशी येथे महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रावर पुनर्विचार करून नव्याने असे भव्यदिव्य असे महाराष्ट्र भवन तातडीने पूर्ण करण्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सिडकोला निर्देश दिले होते त्याच अनुषंगाने आज सिडको व्यवस्थापकीय संचालक अनिल दिग्गिकर व सह व्यवस्थापकीय संचालक (१) चे कैलास शिंदे, तसेच सह व्यवस्थापकीय संचालक (२) शांतनू गोयल, यांजसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवी मुंबईमधील वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची भव्यदिव्य प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात आले. उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची प्रतिकृती कशी असेल ते मी आज प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्र भवनाची प्रतिकृती बघितल्यावर खरच देशात असा महाराष्ट्र भवन असेल की नाही अस मला वाटत नाही. तसेच सदर महाराष्ट्र भवन हे १२ मजल्याचे असून अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये व्ही.आय.पी. रूम तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही रूम ही असणार आहेत. त्याचबरोबर ई लायब्री, कॉनफरंन्स हॉल, फूड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी प्रथमच वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी राहणार राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी वर्ग यांचे आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी आभार मानले.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व नोकरभरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र जागा नसल्याने व हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनासाठी २०१४ पासून जो लढा चालला होता त्याला आज पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र भवनाचे प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती
शिवाजी महाराज यांचा बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज होऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.