खासदार राजन विचारे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नुकताच १४८ ठाणे शहर विधानसभा मतदार संघाची जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी १४८ ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील ओळख न पटलेल्या किंवा वास्तव्य पत्यावर न सापडलेल्या १२५००० मतदारांची नावे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे सोपविली असून त्यामध्ये ठाणे शहर विधानसभा या मतदार संघातील १ लाख २५ हजार मतदारांचा अधिक उच्चांक गाठला आहे. ही बाब खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख व १४८ ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये २५ ठाणे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघापैकी एका विधानसभा क्षेत्रात जर १२५००० मतदार ओळख न पटणारे किंवा स्थलांतर झालेले असतील तर ५ विधानसभा क्षेत्रात किती असू शकतील. त्यामुळे हा मतदार यादीतील घोळ अत्यंत संशयास्पद असल्याचे कळविण्यात आलेले आहे. हि नावे मतदार यादीमध्ये ठेवण्यासाठी काही राजकीय शक्ती क्रियाशील असल्याचा संशय सुद्धा या पत्रामध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये ओळख न पटणारे जेवढे मतदार आहेत त्यांची शहानिशा अत्यंत पारदर्शक पद्धतीने दुबार तपासणी करावी जेणेकरून मतदार यादीत नावे ठेवायची कि वगळायची याबाबत निर्णय घ्यावा. अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणेच निर्णय घ्यावा असे आदेश त्यांना दिले आहेत.
एखाद्या मतदारच नाव CEO Maharashtra या वेबसाईट वर शोधल्यास ते असले तरी ओळख न पटणाऱ्या यादीत जर BLO नी Absent/Permanently Shifted/Death या यादीत समाविष्ठ केले असेल तर याची खातरजमा करायची असेल तर मतदारांना त्या विभागाच्या BLO कडे करावी असे सांगण्यात आले आहे. मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही हे शोधण्यासाठी सोपा मार्ग व्हावा याकरिता आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा अशी मागणीही केली आहे. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असणारा Form ID BLA २ हा फॉर्म इंग्लिश मध्ये न ठेवता तो मराठीमध्येच ठेवण्यात यावा अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
२५ ठाणे लोकसभेची विधानसभा प्रमाणे आकडेवारी
विधानसभा क्षेत्र | ओळख न पटणारे मतदार |
१४५ मीरा भाईंदर विधानसभा | १५९३५ |
१४६ ओवळा माजिवडा विधानसभा | १०४००० |
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा | १३३५० |
१४८ ठाणे शहर विधानसभा | १२४९६५ |
१५० ऐरोली विधानसभा | ४६३६ |
१५१ बेलापूर विधानसभा | १९७४ |
ओळख न पटणारे एकूण मतदार | २६४८६० /- |