संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार, ऐरोलीचे आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ३४ मधील भाजपच्या वतीने दोन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील व माजी नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांच्या माध्यमातून १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ८.३० वाजता या शिबिरास सुरूवात होणार असून या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड बनविणे, बायोमेट्रीक अपडेट करणे, मोबाईल नंबर अपडेट करणे, नवीन मोबाईल नंबर लिंक करणे, नाव, जन्मतारीख, पत्ता अपडेट करणे, इतर दुरुस्ती करणे आदी सुविधा स्थानिक रहीवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील रहीवाशांनी तसेच कुकशेत व सारसोळेच्या ग्रामस्थांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होवून आपली आधारकार्डविषयक कामे पूर्ण करावीत, असे आवाहन स्थानिक माजी नगरसेवका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.