संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुख सुविधा अनुभवयास मिळतात. त्याच बरोबर बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सानपाडा येथील भूखंड क्र. १, सेक्टर – ११, येथे १३ सप्टेंबर २०२३ रोजी सेंट्रल लायब्ररीची पाहणी दौरा करण्यात आला. त्याच बरोबर न.मुं.म.पा चे कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपअभियंता विवेक मुलीये, कनिष्ठ अभियंता अविनाश यादव उपस्थित होते.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सानपाडा येथील स्थानिकांची मागणी होती की आमच्या ही विभागात “सेंट्रल लायब्ररी” व्हावी याच मागणीद्वारे सिडको महामंडळाकडून सानपाडा येथील भूखंड क्र. १, सेक्टर – ११ येथील १७७०.७३. चौ.मीच्या क्षेत्रफळावर “सेंट्रल लायब्ररी” ची वास्तू उभी राहणार आहे. सदर वास्तू ही बेसमेंट+तळमजला+ चार मजली असणार आहे. त्याचबरोबर या “सेंट्रल लायब्ररी” मध्ये पुस्तकांप्रमाणेच आधुनिक काळाला साजेशा ऑडीओ बुक्स, ई-लायब्ररी संकल्पनेचा अंतर्भाव, पर्यावरणपूरक “ग्रीन बिल्डींग, रँम्पवर व्हयुइंग गॅलरीची आकर्षण रचन, पुस्तकाचा प्रवास दर्शविणारा लक्षवेधी प्रदर्शन, लँग्वेज लॅब तसेच ग्रंथ विषयक उपक्रमांकरिता १३० आसनक्षमतेचे अद्ययावत सभागृह, दृष्टीहीन वाचकांसाठी ब्रेल विभाग व मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील वाचनीय साहित्यकृती उपलब्धता या “सेंट्रल लायब्ररी” मध्ये पहावयास मिळणार आहे.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, सानपाडा हा कॉस्मोपॉलिटिन विभाग असल्यामुळे या विभागात “सेंट्रल लायब्ररी” होणे गरजेचे असून आज या कामाचा आढावा या दौऱ्याच्या अनुषंगाने घेण्यात आला. तसेच माझ्या प्रत्येक विकास कामांवर माझे लक्ष असते व त्याचा नेहमी आढावा मी घेत असते. तसेच सर्व नवी मुंबईतील जनतेला ठाऊक आहे की सर्वात जास्त काम हे बेलापूर मतदार संघात होत आहेत त्यामुळेच लोकांचा कौल हा मंदाताई म्हात्रे कडे आहे. तसेच येथील काही स्थानिकांना उद्यान, खेळाचे मैदान अशा विविध समस्या असून न.मुं.म.पा. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे मांडून ते लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिले.
तसेच सानपाडा येथे “सेंट्रल लायब्ररी” होत असल्यामुळे स्पर्धापरीक्षा देणारे विद्यार्थी तसेच पुस्तक वाचकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून याचा फायदा सर्व घटकांना होणार असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे.
तसेच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा समवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष समाजसेवक पांडुरंग आमले, जगन्नाथ जगताप, निलेश वर्पे, चिंतामण बेल्हेकर, रुपेश मढवी, अशोक विधाते, नाना शिंदे, मारुती माने, जयराम खरात, श्रीपाद पत्की, दिशा केणी, स्वाती कदम, सुलोचना निंबाळकर, मोकल ताई, विश्वास बोराडे, पोपट गोडे, मंदार शेलार तसेच असंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.