नवी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे राजकारणापलिकडचे एक कौंटूबिक नाते आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि नवी मुंबई जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जावून गणेश दर्शन घेतले. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची फडणवीसांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्याशीही विशेष कौंटूबिक नाते आहे.